ठाणे : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागाद्वारे ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आज,२४ सप्टेंबर २०२१ रोजी एक दिवशीय निर्यात संमेलन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

वागळे इस्टेट येथील लघु उद्योग संघात आयोजित या एकदिवसयी संमेलनात जिल्ह्यातील औद्योगिक घटकांकडून निर्यात होणाऱ्या वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी उत्पादन, रत्ने व दागिने, रसायने यासंदर्भात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच निर्यात व्यवस्थापन व वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निर्यात प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशा विषयांवर केंद्रीय निर्यात महासंचालनालयाद्वारे उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निर्यातदारांनी या प्रदर्शन व संमेलनात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी केले आहे. 

.........